Peoples Media Pune header

Go Back

ती फौंडेशनच्या वतीने २०० विद्यार्थीनीना सॅनिटरी पॅड वाटप

05 Oct 2018

महिलांसाठी कार्यरत असणा-या मुंबई येथील ती फौंडेशनच्या  डॉक्टर भारती लवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली   चंद्रकांत दरोडे विद्यालयातील सुमारे २०० मुलींना सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले.या प्रसंगी सुदेश रासकर(पोलीस अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते),पुजा कुदळे(मिस सिटाडेल),कृष्णा वैद्य(मिस पुणे फेस्टिव्हल),सुप्रिया ताम्हाणे(सामाजिक कार्यकर्ते),जुई सुहास(कोरिओग्राफर),संगीता आंत्रे(मुख्याध्यापिका),शैलजा जगताप(मुख्याध्यापिका).आदी मान्यवर उपस्थित होते.सुदेश रासकर यांनी आगामी योजनांची माहिती दिली यात व्हेंडिंग मशीनव अन्य बाबींचा समावेश होता.सुप्रिया ताम्हाणे यांनी दर महिन्याला प्रत्येक मुलीला १० पॅडस दिले जातील असे सांगितले.कृष्णा वैद्य हिने बोलताना अनेक मुलींच्या आई आजही कपडा वापरतात.मात्र मुलीनी त्यांना ही पॅड वापरणे शिकवावे,त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी कारण आई सर्व कुटुंबाची काळजी घेत असते असे सांगितले.

छायाचित्र:मान्यवर व विध्यार्थिनी  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite