Peoples Media Pune header

Go Back

होर्डिंग दुर्घटना ग्रस्त शिवसैनिक स्व. शिवाजी परदेशी यांच्या कुटुंबाचे आ.डॉ.नीलमताई गो-हे यांनी सांत्वन केले.मदतीचा धनादेश प्रदान

06 Oct 2018

नुकत्याच जुना बाजार येथिल चौकात झालेल्या होर्डिंग दुर्घटनेत मृत्यू पावलेले शिवसैनिक स्व.शिवाजी परदेशी यांच्या कुटुंबियांची शिवसेना प्रवक्ता आ.डॉ नीलमताई गो-हे यांनी सांत्वना भेट घेतली.व यापुढील काळात ही आवश्यक ती मदत करण्यात येईल असे सांगितले.तसेच बाळासाहेब मालुसरे(विभाग प्रमुख)यांनी दिलेल्या मदतीचा धनादेश सुपूर्त केला.या प्रसंगी समृद्धी शिवाजी परदेशी(मुलगी वय १७),समर्थ परदेशी(मुलगा वय ४)राजेंद्र शिंदे(मा.उपशहर प्रमुख)बाळासाहेब मालुसरे(विभागप्रमुख),हर्षल मालुसरे,युवराज पारीख,अनमोल परदेशी आदी मान्यवर व पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.यावेळी माध्यमांशी बोलतांना डॉ.नीलमताई गो-हे यांनी होर्डिंग धोरण प्रलंबित असल्याने पर्यावरण व लोकांची सुरक्षितता धोक्यात आहे.रेल्वे व मनपा जबाबदारीची टोलवाटोलवी करीत आहे.वाढते ट्राफिक,वाहतूक कोंडी,नुकताच फुटलेला कालवा या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त व विभागीय आयुक्तांनी आपत्कालीन आराखडा बनवावा.कालच्या दुर्घटनेस दोषी असलेल्या रेल्वे अधिका-यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी केली.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite