Peoples Media Pune header

Go Back

आम्ही अभिनवकरच्यावतीने विविध क्षेत्रांतील व्यक्तींचा पुरस्कार देवून सन्मान

08 Oct 2018

कोथरूड येथील अभिनव शाळेतील माजी विद्यार्थी,शिक्षक,व शिक्षकेतर संघ संस्थेच्या वतीने तेथे शिक्षण घेतलेल्या व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा ज्येष्ठ लेखक अरुण खोरे यांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.ते पुढील प्रमाणे संजय भोर(उद्योजक)यांना अभिनव रत्न पुरस्कार.मंगेश जोशी(उपजिल्हाधिकारी)अभिनव रत्न पुरस्कार.,संगीता पुराणिक बाई(माजी शिक्षिका)माजी शिक्षक कृतज्ञता पुरस्कार,.दिगंबर देसाई(माजी शिक्षक)माजी शिक्षक कृतज्ञता पुरस्कार”,.नामदेव मुळीक(माजी कर्मचारी) माजी शिक्षकेतर कर्मचारी सत्कार. करण्यात आला.पुरस्काराचे स्वरूप शाल,श्रीफळ,मानपत्र,व स्मृतिचिन्ह असे होते.कोथरूड येथील अंबर हॉल येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी श्री पाटील सर(मुख्याध्यापक)शिरीष पुराणिक,तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी,अनेक माजी शिक्षक शिक्षिका,कर्मचारी व माजी विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना मंगेश जोशी यांनी अभिनव शाळेने फक्त शिक्षणच दिले नाही तर व्यक्तिमत्व घडविले,अन्य विषय तर सोडाच पण चित्रकलेचे शिक्षकही विद्यार्थ्यांना चुकी बद्दल चौदावे रत्न(मार)देत असल्याची गमतीशीर आठवण सांगितली.अध्यक्षीय भाषणात अरुण खोरे यांनी सध्याच्या काळात शिक्षक-विद्यार्थी संबंध,विद्यार्थी व त्यांचे पालक यांचे सम्बन्ध दुरावत चालल्याची खंत व्यक्त केली व हे संबंध दृढ व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

छायाचित्र :सत्कारीत मान्यवर(खुर्चीत बसलेले),व पदाधिकारी(मागे उभे)समूह चित्र 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite