Peoples Media Pune header

Go Back

बीएनआय पुणे इस्ट व कतार येथील बीएनआय पायोनियर व बीएनआय फोनिक्स यांची संयुक्त व्यवसाय बैठक संपन्न.

09 Oct 2018

२०२० साली कतार येथे वर्ल्डकपचे आयोजन होणार आहे.मात्र कतार व शेजारील राष्ट्रांमध्ये काही वाद आहेत.या पार्श्वभूमीवर पुणे पूर्व भागातील बीएनआय इन्स्पायर विभाग(चॅप्टर)चे १२ सदस्यांच्या शिष्टमंडळाने दोहा(कतार)येथील बीएनआय पायोनियर व बीएनआय फोनिक्स यांच्या बरोबर ४ दिवसांचे बैठक सत्र केले.या दौ-याचे आयोजन व मार्गदर्शन कार्यकारी संचालक अतुल जोगळेकर व भरत डागा पुणे व मोहम्मद शाबीब कतार(कतार)यांनी केले.याचे फलस्वरूप म्हणून ३ भागीदारी प्रस्ताव व १० देवाणघेवाण प्रस्ताव पूर्णत्वास गेले व २१ संपर्क प्रस्तावांची दोन्ही देशांत देवान घेवाण झाली.बीएनआय ही व्यावसायिकांचे संघटन असून याद्वारे ७० देशांतील व्यावसायिक सदस्य देवाणघेवाण व व्यावसायिक संधी निर्माण करतात,या बैठकीद्वारे भारत व कतार यांच्यातील व्यवसायिकां मध्ये संपर्क प्रस्थापित होऊन व्यावसायिक प्रगतीला चालना मिळेल असे भरत डागा यांनी नमूद केले.

छायाचित्र:दोन्ही देशांतील बीएनआय सदस्य व उपस्थित मान्यवर  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite