Peoples Media Pune header

Go Back

कै.सौ.सुंदरबाई राठी प्रशालेतील “अटल टिंकरिंग लॅबचे.डॉ.दीपक शिकारपूर यांच्या हस्ते उद्घाटन

10 Oct 2018

कै.सौ.सुंदरबाई राठी प्रशाला-सेवासदन येथील अटल टिंकरिंग लॅबचे उद्घाटन संगणक तज्ञ डॉ.दीपक शिकारपूर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी डॉ.गणपत मोरे(शिक्षण अधिकारी माध्यमिक),मीनाक्षी राऊत(प्रभारी शिक्षण उपसंचालक),अश्विनी कदम(माजी स्थायी समिती अध्यक्ष),संध्या माने(मुख्याध्यापिका),चिंतामणी पटवर्धन(संस्था सरचिटणीस),स्मिता फाटक(शाळा समिती सदस्य),श्रीधर पाटणकर(शाळा समिती सदस्य),हरीश्चंद गायकवाड(पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ अध्यक्ष),शिवाजी खांडेकर(शिक्षकेतर कर्मचारी संघटना अध्यक्ष)आदी मान्यवरांच्या बरोबरच शिक्षणवर्ग व २०० विद्यार्थिनी उपस्थित होत्या.या लॅब मध्ये विद्यार्थिनींसाठी रोबोटिक प्रोजेक्टचे सर्व साहित्य उपलब्ध करून दिले आहे.या प्रसंगी बोलतान डॉ.दीपक शिकारपूर यांनी मुलीनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग समाजातील आपल्या आसपासच्या समस्या सोडविण्यासाठी करावा.त्या गरजा-समस्या ओळखून त्या सोडविणारी साधने बनवावीत असे प्रतिपादन केले.

छायाचित्र:लॅबमध्ये विद्यार्थीनिनी बनवलेले प्रकल्प पाहताना मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite