Peoples Media Pune header

Go Back

“संपूर्ण क्रांती रथ यात्रा”चे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा,मार्केटयार्ड येथे स्वागत

10 Oct 2018

किरकोळ क्षेत्रात परकीय गुंतवणूक, अॅमेझॉन-फ्लिपकार्ट कराराला विरोध दर्शविणे,तसेच पारदर्शक व्यापार धोरण असावे आणि यासाठी स्वतंत्र खाते हवे.या मागण्यांसाठी १५ सप्टेंबर रोजी दिल्लीहून निघालेली देशस्तरावरील :संपूर्ण क्रांती रथ यात्रापुण्याला पोचली.तिचे स्वागत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्केटयार्ड येथे करण्यात आले.या प्रसंगी अजित शेटीया(कॅट पच्छिम विभाग समन्वयक),दिलीप कुंभोजकर(कॅट पुणे अध्यक्ष),पोपटशेठ ओसवाल(अध्यक्ष पुणे मर्चंट चेंबर),रतन किराड(उपाध्यक्ष पुणे व्यापारी महासंघ),महेंद्र पितळे(सचिव पुणे व्यापारी महासंघ),राजेश शहा(वरिष्ठ कार्याध्यक्ष फॅम मुंबई),सचिन निवंगुणे(अध्यक्ष पुणे जिल्हा किरकोळ व्यापारी संघ),कमलेश शहा(अध्यक्ष पुना होलसेल जनरल मर्चंट असो),राजेश फुलफगर(राष्ट्रवादी काँग्रेस पुणे व्यापारी सेल अध्यक्ष),रोशनी जैन(कॅट सदस्य),वीरेंद्र सिह वालिया (रथयात्रा संचालक)व अमरसी करीया रथयात्रा सहसंचालक.आदी मान्यवर उपस्थित होते.ही यात्रा मार्केट यार्ड-टिम्बर मार्केट-क्वाटरगेट-लक्ष्मीरोड-अलकाटॉकी,दांडेकर पूल-सिंह्गड रस्ता येथे परिणय मंगल कार्यालयात सभा घेवून पुढे मार्गस्थ झाली.दिनांक १६ डिसेंबर रोजी रामलीला मैदान येथे लाखो व्यापा-र्यांच्या उपस्थितीत या रथयात्रेचा समारोप होईल असे अजित शेठीया व दिलीप कुंभोजकर यांनी नमूद केले 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite