Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब सारसबागच्या वतीने डॉ.जगन्नाथ दीक्षित,वालचंद संचेती,विशाल चोरडिया,व निपुण धर्माधिकारी यांना पुरस्कार जाहीर.

12 Oct 2018

रोटरी क्लब ऑफ सारसबाग दरवर्षीप्रमाणे SERA-सर्व्हिस एक्सलंस रेकग्निशन अॅवॉर्ड,आणि VERA-व्होकेशनल एक्सलंस रेकग्निशन अॅवॉर्ड प्रदान करणार आहे.हा समारंभ बुधवार दिनांक १७ ऑक्टोबर २०१८ रोजी अण्णाभाऊ साठे सभागृह येथे संध्याकाळी ६.३० वाजता संपन्न होईल.यंदाचे पुरस्कार विजेते.सेरा –डॉ.जगन्नाथ दीक्षित(वेट लॉस आणि डायबेटिक मधील कार्य),वालचंद संचेती(शिक्षण क्षेत्रातील कार्य),वेरा-विशाल चोरडिया(ख्यातनाम उद्योजक),निपुण धर्माधिकारी(सिनेमा दिग्दर्शक),कार्यक्रमाचे अध्यक्ष रोटरी प्रांत ३१३१ चे प्रांतपाल रो.डॉ.शैलेश पालेकर,प्रमुख पाहुणे कायनेटिक ग्रुपचे चेअरमन अरुण फिरोदिया,रोटरी सारसबागचे अध्यक्ष रो.ललित बोथरा(संयोजक),पी.आय डायरेक्टर रो.संजय साताळकर व अन्य पदाधिकारी तसेच रोटरी क्लब सदस्य व कुटुंबीय उपस्थित असतील.शाल,श्रीफळ,मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे असे ललित बोथरा यांनी नमूद केले. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite