Peoples Media Pune header

Go Back

स्वच्छता कर्मचारी महिलांच्या हस्ते देवीची आरती,विरबाबा मंडळाचा उपक्रम.

14 Oct 2018

शारदीय नवरात्र उत्सव निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.विरबाबा नवरात्र उत्सव मित्रमंडळ,साईनगर यांच्यावतीने झाडू मारणा-या स्वच्छता कर्मचारी भगिनींच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली.तसेच त्यांचा शाल व नारळ देवून सत्कार करण्यात आला.या भगिनी वर्षभर उन असो कि पाऊस तरी परिसर स्वच्छता करण्याचे काम आनंदाने करीत असतात व यामुळे रोगराईवर नियंत्रण येते व आरोग्याचे रक्षण होते.यासाठी यावर्षीचा महाआरतीचा मान त्यान देण्यात आला.या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर राठोड,रुपाली आयगोळ,सविता शिंदे,वनमाला खटकाळे,रत्ना डोंगरे,प्रदीप मेनन,प्रवीण आगळे,बशीर शेख ,मार्शल,शिधार्थ निकाळजे,जोशी काका आदी मान्यवरांच्या बरोबरच मंडळाचे कार्यकर्ते,नागरिक व महिला मोठ्या संखेने उपस्थित होते.हा सन्मान दिल्याबद्दल कर्मचारी महिलांनी आनंद व्यक्त केला   

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite