Peoples Media Pune header

Go Back

रोटरी कर्वेनगरच्या वतीने मार्कोस कमांडो प्रवीण तेवतीया यांना “व्यावसायिक गुणवत्ता”,पुरस्कार प्रदान

15 Oct 2018

रोटरी क्लब कर्वेनगरच्या वतीने प्रवीण तेवतीया(मार्कोस कमांडो रिटा.)यांना प्रांतपाल रो.डॉ.शैलेश पालेकर यांच्या हस्ते व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार(व्होकेशनल एक्सलंस अवोर्ड)प्रदान करण्यात आला.गरवारे कॉलेज सभागृह कर्वेरोड येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब कर्वेनगरचे अध्यक्ष रो.शिरीष पुराणिक,सेक्रेटरी आशा अमोणकर,एमईएस सोसायटीचे भरत बनकर,डॉ.पंढरीनाथ बुचडे,रो.शिरीष मंदसोरवाले,आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी पदाधिकारी व सदस्य तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.शाल,श्रीफळ,मानपत्र,व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.सत्काराला उत्तर देताना प्रवीण तेवतीया यांनी तरुणांनी नेहमी सकारात्मक असावे,हे जमणार नाही ते जमणार नाही पेक्षा मी सर्व काही करू शकतो असा आत्मविश्वास बाळगून परिश्रम करावेत.जगात कोणतेच प्रमाणपत्र माणसाची क्षमता सांगत नाही.असे सांगितले.शैलेश पालेकर यांनी मुंबई-ताजहॉटेल वरील अतिरेकी हल्ला प्रसंगी प्रवीण तेवतीया यांनी दाखविलेले शौर्य व त्यानंतर शारीरिक हानीवर केलेली मत ही अद्वितीय असून त्यांचा सन्मान रोटरीने केल्याचा विशेष आनंद झाल्याचे सांगितले.

छायाचित्र:पुरस्कार प्रदान प्रसंगी डावीकडून आशा आमोणकर,शैलेश पुराणिक शैलेश पालेकर,व प्रवीण तेवतीया  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite