Peoples Media Pune header

Go Back

जिओक्लीड ३ डी प्रिंटींग कंपनीचे प्रिंटर उद्घाटन संपन्न

16 Oct 2018

३ डी प्रिंटींग क्षेत्रात अग्रगण्य अशा जरीवाला रोबोटिक चे अधिकृत वितरक जिओक्लीड च्या वतीने प्रिंटरचे उद्घाटन व विविध उत्पादने प्रदर्शन समारंभ नुकताच हॉटेल प्रेसिडेंट येथे संपन्न झाला.यावेळी ३ डी प्रिंटरर्सची माहिती देण्यात आली.खगेश देशपांडे यांनी बोलताना या प्रिंटर्सचा वापर प्रशिक्षण व प्रतिकृती (प्रोटोटाईप)बनविण्यासाठी होतो,यामुळे उत्पादक कंपन्यांचा वेळ,श्रम व पैशांची बचत होते व दर्जेदार उत्पादन तयार होते असे सांगितले.जरीवाला यांनी बोलताना आगामी काळात या संकल्पनेचा मोठा विस्तार होणार असून सरकार त्यासाठी मदत करीत आहे.याचा वापर लघुद्योग म्हणून तरुणांना करता येईल,विविध उत्पादने तयार करून स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्री करता येईल,तसेच शाळांना विद्यार्थ्यांना तांत्रिक प्रशिक्षण, उद्योगांना प्रतिकृती बनविणे सोपे व स्वस्त होईल.तसेच यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षणअटल टिंकरिंग लॅब ,तांत्रिक सहाय्य,व कच्चा माल कंपनीकडून दिले जाईल असे सांगितले.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite