Peoples Media Pune header

Go Back

रोटरी कल्याणीनगरच्या वतीने विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी.

16 Oct 2018

रोटरी क्लब ऑफ कल्याणीनगर अग्रदूत बांगला समाज,व कॅनवस किड्स स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने संतुलन संस्थेच्या ७० अनाथ मुला मुलींची आरोग्यतपासणी करण्यात आली.त्यांना स्टेशनरी,स्कूल बॅग व टी शर्ट देण्यात आले.गेरा पार्क मैदान,खराडी येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी कल्याणीनगरच्या अध्यक्ष राशी वाजपेयी,प्रकल्प प्रमुख डॉ.निखील ढोरे पाटील,श्री हॉस्पिटलचे डॉ.यशोमती ढोरे,कॅनवस किड्स प्री स्कूलच्या सीमा तंवर,अग्रदूत बांगला समाजचे बबलू मायती,अभिजित पोतदार,संदीप भट्टाचार्य आदी मान्यवर उपस्थित होते.हा कार्यक्रम ४ दिवस असून यात रक्तदान शिबीर,आरोग्य तपासणी,व गुड टच बॅड टच जागृती यांचा समावेश आहे असे राशी वाजपेयी यांनी सांगितले. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite