Peoples Media Pune header

Go Back

“सासरची साडी”.मराठी चित्रपट २६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित.

18 Oct 2018

सासरची साडी हा मराठी चित्रपट कौटुंबिक असून समाजात व प्रत्येक घराघरात घडणा-या विषयावर हा चित्रपट आहे.तसेच अंधश्रद्धेमुळे कशा प्रकारची संकटे येतात.हे दाखविणारा मराठी सिनेमा आहे.यात घरातील वयोवृद्ध,आई,वडील आणि मुले यांना अधोरेखित केले आहे.येत्या शुक्रवार दिनांक २६ ऑक्टोबर रोजी या चित्रपटाचे प्रदर्शन होणार आहे.यामध्ये प्रमुख भूमिकेत मेघा पवार,संदीप पवार,प्रकाश धोत्रे,प्रेमा किरण,कृष्णा भिंगारे,व बाल कलाकार ओंकार जाधव हे कलाकार काम करीत आहेत.चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप पवार यांनी केले आहे.तर निर्माते दत्तात्रय उंद्रे आहेत.म्हसोबा प्रोडक्शनने निर्मित केलेला हा चित्रपट ६ सेन्स फिल्म प्रोडक्शन सर्वत्र प्रदर्शित करीत आहे.तरी सर्वांनी हा चित्रपट आवर्जून पहावा असे आवाहन ६ सेन्स प्रोडक्शनचे एमडी  संतोष महाले व दिग्दर्शक संदीप पवार यांनी पत्रकार परिषदेत केले.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite