Peoples Media Pune header

Go Back

सनशाईन वर्ल्डवाईल्ड स्कूल,गोवाच्या आता पुण्यात शाखा.

30 Oct 2018

सनशाईन वर्ल्डवाईल्ड स्कूल,गोव्यातील एक उत्तम आणि अग्रगण्य शाळा आता त्यांच्या इंग्रजी माध्यमाच्या पूर्वप्राथमिक शाळांचे जाले पूर्ण देशभरात पसरवत आहे.याची सुरुवात म्हणून मागच्या शैक्षणिक वर्षात सनशाईन वर्ल्डवाईल्ड स्कूलची पहिली शाळा कोल्हापूर येथे सुरु केली आणि आता सनशाईन वर्ल्डवाईल्ड स्कूल विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणा-या पुणे येथील बाणेर आणि धायरी येथे इंग्रजी माध्यमाच्या पूर्वप्राथमिक शाळा सुरु करत आहे.सण २०१० साली स्थापन झालेली सनशाईन वर्ल्डवाईल्ड स्कूल ही सुरवातीपासूनच विद्यार्थी केंद्रित पूर्वप्राथमिक शिक्षण देण्यावर भर देत असून गोव्यातील विविध भागात विद्यार्थीप्रिय आणि पालकप्रिय झाली आहे.विद्येच्या माहेरघरातील विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण पूर्वप्राथमिक शिक्षण देण्याच्या या संधीचा फायदा पुण्यातील १ ते ६ वयोगटातील विद्यार्थ्यांना नक्कीच होईल. सनशाईन वर्ल्डवाईल्ड स्कूलने त्यांच्या शिक्षकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे असरदार आणि नाविन्यपूर्ण प्रशिक्षण दिले असून या मुळे त्या शाळांमध्ये अत्यंत सकारात्मक वातावरण निर्मिती होते.या स्कूलमध्ये विद्यार्थी ब-याच गोष्ठी केवळ एैकूण,बघून आणि स्वतः करून शिकू शकतात.अशा पद्धतीचे शिक्षण देत असताना मुलांची सुरक्षितता,एकमेकांना आदर देवून उत्तम नागरिक निर्माण करण्याच्या एका मोठ्या प्रक्रियेलाच सुरुवात केली जाते.या शाळांमध्ये अतर्गत स्पर्धा टाळून एका स्वतंत्र आणि तणावमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली जाते.मुलांना स्वतःतील आनंदाची प्रचीती देणा-या सनशाईन वर्ल्डवाईल्ड स्कूलचे आम्ही पुण्यात स्वागत करतो,असे सनशाईन वर्ल्डवाईल्ड स्कूलचे महाराष्ट्रातील संचालक विद्याचरण पुरंदरे यांनी सांगितले.तर पुण्यासारख्या शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या शहरात आमच्या ज्ञानातून जन्मलेल्या पूर्वप्राथमिक शाळा सुरु करताना आम्हाला आनंद होत आहेअशी भावना सनशाईन वर्ल्डवाईल्ड स्कूलचे मार्केटिंग डायरेक्टर कुष खेतान यांनी बोलून दाखवली. आमच्या नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धतीच्या सहाय्याने एक उत्तम,सकारात्मक आणि कौशल्याधारित पिढी घडविण्याच्या कामात पुण्यात येणा-या आमच्या सर्व शाळा भरच घालतील असा विश्वास वाटतोअसे प्रतिपादन सनशाईन वर्ल्डवाईल्ड स्कूलचे संस्थापक असलेल्या दीपक खेतान यांनी केले.अधिक माहितीसाठी संपर्क :- romaharashtra@sunshineworldwideschool.com

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite