Peoples Media Pune header

Go Back

मराठी साहित्य सम्मेलन अध्यक्ष अरुणा ढेरे यांचे आ.डॉ.नीलमताई गो-हे यांच्या कडून अभिनंदन

31 Oct 2018

आगामी जागतिक मराठी साहित्य सम्मेलन अध्यक्ष प्रख्यात साहित्यिक अरुणा ढेरे यांची शिवसेना प्रवक्त्या व उपनेता आ.डॉ.नीलमताई गो-हे यांनी त्यांच्या सहकार नगर येथील निवासस्थानी भेट घेवून अभिनंदन केले.पुष्पगुच्छ,व तिरुपती बालाजी येथून आणलेली शाल भेट दिली.या प्रसंगी बोलताना अरुणाताई ढेरे यांनी आगामी काळात साहित्य विषयक विविध प्रकल्प राबविणार आहे.त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे,डॉ.नीलमताई गो-हे यांचे सामाजिक कार्य सर्वाना माहित आहे मात्र त्यांनी पूर्वी बरेच लिखाण केले आहे.त्यांनी पुन्हा लिहिते व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.डॉ.नीलमताई गो-हे यांनी बोलताना अरुणाताई ढेरे यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला व एक स्री म्हणून नाही तर गुणवत्ता पाहून त्यांची निवड झाली.तसेच साहित्य विश्वात नवा पायंडा पडल्याबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषदेचे आभिनंदन केले.या प्रसंगी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी,राजेंद्र शिंदे(मा.उपशहर प्रमुख),विभाग प्रमुख अमोल रासकर,अर्जुन जानगवळी,सचिन देडे,उपविभाग प्रमुख गणपत साळुंखे,सुरज खंडागळे,सुधीर शेळके,अमोल खवळे,शाखा प्रमुख प्रशांत लोंढे आदी उपस्थित होते.

छायाचित्र :अरुणाताई ढेरे यांचा सत्कार करताना आ.डॉ.नीलमताई गो-हे व अन्य 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite