Peoples Media Pune header

Go Back

सुर्यदत्ता पब्लिक स्कूलमधील ऋतुजा गोरेला राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

02 Nov 2018

विभागीय क्रीडा संकुल,गारखेडा परिसर,औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तर शालेय तायक्वांदो स्पर्धेत सूर्यदत्ता पब्लिक स्कूलच्या ऋतुजा गोरे हिने १९ वर्षाखालील मुली या वयोगटात अंतिम सामन्यात नाशिक विभागाच्या खेळाडूचा ३७-११ अशा मोठ्या फरकाने पराभव करत सुवर्णपदक पटकविले व तिची राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.ऋतुजा गेली ११ वर्ष तायक्वांदोचा सराव करत असून आत्तापर्यंत तिने अनेक राज्य व राष्ट्रीय आणि अंतर राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक प्राप्त केले आहेत.तिचे ऑलिम्पिक स्पर्धेत यश मिळवायच्या स्वप्नासाठी सुर्यदत्ता इन्स्टिट्यूट मधून तिला सर्व प्रकारे सहकार्य व प्रोत्साहन दिले जात आहे सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्था विकास व्यवस्थापक सिद्धांत चोरडिया व संस्थेचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा.निशिगंधा पाटील व संकेत नालकर यांनी ऋतुजाचे अभिनंदन केले.व सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय चोरडिया यांनी ऋतुजाचे गुणवत्ता प्रमाणपत्र देवून विशेष अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite