Peoples Media Pune header

Go Back

सुर्यदत्ता पब्लिक स्कूल व सुर्यदत्ता ज्यु कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विभागीय मध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक पटकवत राज्यस्तरीय तिरंदाजी स्पर्धेसाठी निवड

02 Nov 2018

जिल्हा क्रीडा अधिकारी सोलापूरकार्यालय तर्फे आयोजित करण्यात आलेल्या विभागीय तिरंदाजी स्पर्धेतील कंपाऊडया प्रकारात सुर्यदत्ता पब्लिक स्कूलचा विद्यार्थी अखिलेश भोसले व सुर्यदत्ता ज्यु कॉलेजचा विद्यार्थी यश बारगुजे यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकविला.त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.सदर स्पर्धेत १९ वर्षाखालील मुले या गटात एकूण ५ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धा श्री विनायक विद्यालय वरावडे,ता.माढा जि.सोलापूर येथे पार पडल्या.या दोन्ही विद्यार्थ्यांनी पुरंदर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत उत्तम कामगिरी केल्यामुळेच त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली होती.सदर विद्यार्थ्यांना सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा.संकेत नालकर,व प्रा.निशिगंधा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन ,संस्थापक अध्यक्ष डॉ.प्रा.संजयजी चोरडिया यांनी त्यांचे मानपत्र देवून अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.सदर यशाबद्दल संस्थेचे सदस्य व संस्था विकास व्यवस्थापक सिद्धांत चोरडिया यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite