Peoples Media Pune header

Go Back

“आजचे बंदी उद्याचे हास्यदूत बनावेत”,-मकरंद टिल्लू

02 Nov 2018

मनुष्य जीवनात हास्याला मोठे महत्व आहे.कितीही मोठे संकट दु:खाची वेदना कमी करण्याचे काम हास्य योग करते.आज समोर असलेले २०० बंदी बांधव हे उद्याचे हास्यदूत होऊ शकतील,असा विश्वास लाफ्टरयोगा इंटरनॅशनल,महाराष्ट्रचे प्रदेश अध्यक्ष मकरंद टिल्लू यांनी व्यक्त केला.येरवडा कारागृहातील रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्यनगर यांच्या वतीने आयोजित केलेल्या हास्य शाळेत टिल्लू बोलत होते.हसण्याला काही कारण लागत नाही.लहान बाळ दिवसभरात ३०० वेळा हस्ते मग त्याला काही कारण लागत नाही.विनोदाशिवाय आपण हसू शकतो मग तरीही आपण हसायला का लाजतो ?.म्हणूनच लहान मोठ्या सर्वांनी हसत रहावे व निरोगी आयुष्य जगावे.नको महागडे ते औषध-नको औषधाची गोळी,सुखी आयुष्यासाठी मित्रांनी रोज वाजवा टाळी असा मौलिक सल्ला टिल्लू यांनी दिला.त्यांनी शिकवलेल्या प्रत्येक हास्य कलेस उपस्थितांनी मोठा प्रतिसाद दिला.जेथे असू तेथेही आम्ही हसत राहू अशी प्रतिज्ञा सर्व कैदी बांधवानी घेतली.कारागृह अधीक्षक यु.टी.पवार यांनी उपस्थितांचे स्वागत केले.रो.महेश घोरपडे यांनी कार्यक्रम संयोजक म्हणून काम पहिले.तुरुंग अधिकारी श्री क्षीरसागर यांनी रोटरी क्लबच्या सर्व सभासद यांचे स्वागत करून सर्व संयोजक व उपस्थितांचे स्वागत करून सर्व संयोजक व उपस्थितांविषयी आदर व्यक्त केला.तासभर चाललेल्या हास्यखेळात कारागृहातील इतर अधिका-यांनी मोठा सहभाग घेतला.क्लब अध्यक्ष रो.वासवी मुले यांनी बंदीजनांसाठी काही पुस्तके भेट दिली.कारागृह उपअधीक्षक सदानंद गायकवाड यांनी अशा प्रकारचे उपक्रम बंदीजणांसाठी खूप उपयुक्त ठरतील अशी आशा व्यक्त केली.या कार्यक्रमात रो सुधीर काकडे.रो.टीना रात्र,रो कुदळे उपस्थित होते.या उपक्रमात सुनील जगताप यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite