Peoples Media Pune header

Go Back

शिवसेनेच्या वतीने पवळे चौक येथे स्वस्त फराळ विक्री केंद्राचे उद्घाटन

04 Nov 2018

हल्लीच्या गतिमान युगात अनेकांना दिवाळीसाठी घरी फराळ तयार करणे शक्य होत नाही.त्यामुळे तयार फराळ मिळणे ही आवश्यक बाब बनली आहे.हे लक्षात घेवून कसबा पेठेतील शिवसेना कार्यकर्ते अनिल जाधव हे गेली १९ वर्ष कसबापेठेतील पवळेचौक यथे स्वस्त फराळ विक्री केंद्र चालवतात.यंदाचे वर्ष हे २० वे आहे.याचे उद्घाटन बाळाभाऊ कदम(संपर्क प्रमुख)यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी आयोजक अनिल जाधव.नगरसेविका पल्लवीताई जावळे.शहर संघटक राजेंद्र शिंदे.बाळासाहेब मालुसरे,मकरंद पेठकर(कार्यालय प्रमुख),नागेश खडके,अनमोल परदेशी,सुनील कदम,नंदकुमार काळे,सुरेश झोळ,मोहन परदेशी,इरफान शेख,धवल जाधव,रामदास सूर्यवंशी,गुलाब पवार,राज्य शिंदे,जयश्री भणगे,अनिता जाधव,साधना चिंबकर,भारती जाधव,अभिषेक जाधव,आदी मान्यवर उपस्थित होते.या केंद्रावर मोतीचूर लाडू,बेसन लाडू,रवा लाडू,दगडी चिवडा,मका चिवडा,पातळ पोहे चिवडा,शंकरपाळी,अनारसे,चकली,करंजी हे पदार्थ स्वस्त दरात नागरिकाना उपलब्ध आहेत. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite