Peoples Media Pune header

Go Back

बीएनआय उद्योजकांनी निवारा वृद्धाश्रमातील आजी आजोबांसोबत साजरी केली दिवाळी

06 Nov 2018

भारतीय संस्कृतीत दिवाळी हा कौटुंबिक सण आहे.त्यात सर्व कुटुंबीय एकत्र येतात.बीएनआय पूर्व या उद्योजकांच्या संस्थेतील प्रॉस्पेरीटी चॅप्टरच्या उद्योजकांनी यंदाची दिवाळी निवारा वृद्धाश्रमातील आजी-आजोबां सोबत साजरी केली.या आजी आजोबाना विशेष पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते.या प्रसंगी पूर्व विभाग डायरेक्टर भरत डागा, प्रॉस्पेरीटी चॅप्टर अध्यक्ष रूपल आगरवाल आदी मान्यवरांच्या बरोबरच सदस्य उपस्थित होते.भरत डागा म्हणाले   कोणताही व्यवसाय-उद्योग हा कायमस्वरूपी राहू शकत नाही जोपर्यंत तो समाजातील गरजूना मदत करीत नाही.उद्योजक असूनही या संस्थेतील सदस्यांचे परस्परांतील संबंध अत्यंत कौटुंबिक होते हे पाहून उपस्थित आजी आजोबा भारावून गेले.आम्हाला कोणती भेटवस्तू अथवा अन्य अपेक्षा नसते फक्त कोणी प्रेमाने बोलणे-संवाद साधने आवडते अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

छायाचित्र ;आजी आजोबां सोबत दिवाळी साजरी करताना प्रॉस्पेरीटी चॅप्टर सदस्य 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite