Peoples Media Pune header

Go Back

फरासखाना पोलीस स्टेशन येथे कृतज्ञता दिवाळी साजरी.

09 Nov 2018

पोलीस बांधव वर्षाचे सर्व दिवस आपले कर्तव्य चोखपणे बजावत असतात.त्यांना सण साजरे करता येत नाही.हे लक्षात घेवून पतितपावन संघटना,शिवा फौंडेशन व श्रावणबाळ फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने फरासखाना पोलीस स्टेशन येथे कृतज्ञता दिवाळी साजरी करण्यात आले.तेथे पणत्यांची आरास करण्यात आली.व उपस्थित अधिकारी व पोलिसांचा सत्कार करण्यात आला.पोलीस बांधवानी ही या कार्यकर्त्यांना गुलाबाचे फुल देवून सत्कार केला.या प्रसंगी शिवा फौंडेशनचे अध्यक्ष निरंजन दाभेकर,वंदेमातरमचे वैभव वाघ,श्रावणबाळ फौंडेशनचे मयूर कडू,वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे,पोलीस निरीक्षक (गुन्हे) –संभाजी शिर्के आदी मान्यवरांच्या बरोबरच कार्यकर्ते व पोलीस बांधव उपस्थित होते.फरासखाना यथे प्रथमच अशा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

छायाचित्र :कार्यकर्ते व पोलीस यांचे समूहचित्र 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite