Peoples Media Pune header

Go Back

सॅटर्डे क्लबच्या मराठी उद्योजकांनी साजरी केली मराठमोळी दिवाळी.

09 Nov 2018

मराठी उद्योजकांनी परस्पर सहकार्याने आपले उद्योग वाढवावेत या संकल्पनेतून ब्रिज इंजिनियर स्व.माधवराव भिडे यांनी स्थापन केलेल्या सॅटर्डे क्लबच्या कोथरूड शाखेने पारंपारिक मराठमोळ्या पद्धतीने दिवाळी साजरी केली.हॉटेल आर्चिड कर्वेनगर यथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी उद्योजक महिला व उद्योजक पुरुष पारंपारिक वेशभूषा परिधान करून सहभागी झाले.अनेक जुनी संगीत नाटकातील पद्ये व मराठी गीते काहींनी सादर केली.या प्रसंगी सॅटर्डे क्लब कोथरूडचे अध्यक्ष विनायक देशपांडे,प्रशांत देशपांडे,ऋषिकेश बडवे,सौमित्र घोटीकर,सुहास फडणीस,प्रदीप कुलकर्णी आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रांतील मराठी उद्योजक उपस्थित होते.उद्योगाद्वारे चांगल्या मार्गाने श्रीमंती मिळविणे,म्हणजेच वर्षभर लक्ष्मीपूजन करणे होय असे सौमित्र घोटीकर यांनी यावेळी सांगितले.

छायाचित्र: सॅटर्डे क्लबच्या कोथरूड शाखेचे उद्योजक पारंपारिक वेशभूषेत 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite