Peoples Media Pune header

Go Back

“दिमाखीलाल”हा मराठी चित्रपट २८ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार

28 Nov 2018

मानव जातीचे कल्याण करण्यासाठी दिमाखीलाल वेगवेगळी उपकरणे तयार करतो.मानवी जीवनातील संताप,दु:ख विसरून कमी व्हावे यासाठी त्याने ही उपकरणे बनवलेली आहेत.हा चित्रपट आरशा सारख्या समाज जीवनाची वस्तुस्थिती दाखवतो.दिमाखीलालचा मित्र राहुल आत्महत्या करतो कारण त्याला पुनर्जन्म घ्यायचा असतो.या सर्व गोष्टींमुळे दिमाखी डिप्रेशन मध्ये जातो.यातून तो कसा बाहेर येतो.या संदर्भातील सगळा प्रवास या चित्रपटात दाखवला आहे.या चित्रपटात मुख्य भूमिकेत स्वराज फडतरे,ज्ञानेश आदी.कलाकार आहेत.दिग्दर्शक जितेंद्र वानखेडे,सुनील अग्रेसर,निर्माता मुसादीत मुकादम,आहेत.असे सिक्स सेन्स फिल्म प्रोडक्शनचे एमडी.संतोष महाले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.या प्रसंगी प्रशांत वडके,सागर शेलार,आदी उपस्थित होते.

पालक बालकांचे प्राथमिक शिक्षक असतात .यशाची पहिली पायरी म्हणजे पालक यातच अपयश आल्यामुळे मुल आक्रमकतेवर येतात आणि समाजात असंतोष माजतो असा संतोष थांबवण्यासाठी कायदा अपूर्ण पडतो . तुमच्या जीवनाचा अंत नरकरूपी करणाऱया या सैतानाचा नायनाट करण्यासाठी जणू काही दिमाखिलाल अवतरीत झालेला आहे . दिमाखिलाल या मराठी चित्रपटात पहिल्यांदाच रोबोट .ड्रोन डॉक्स मशीन वापरण्यात आलेले आहे.परंतु सामाजिक प्रश्न हे मशीन सोडवू शकत नाही मग त्यावर उपाय काय? तुमच्या जीवनाचा अंत सुखमय होण्यासाठी दिमाखाला अवतरित झालेला आहे

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite