Peoples Media Pune header

Go Back

जागतिक एड्स दिनानिमित्त “एचआयव्ही जागरूकता”रॅलीचे आयोजन.

01 Dec 2018

जागतिक एड्स दिनानिमित्त मुक्ती उद्धरण सेवा ट्रस्ट(आशा फेलोशिप)यांच्या वतीने एचआयव्ही जागरूकतारॅलीचे आयोजन करण्यात आले.याची सुरुवात सिटीपोस्ट लक्ष्मीरोड  येथून झाली ती क्रांती चौक-दाणेआळी-ढमढेरे गल्ली,नंतर सार्वजनिक काकासाहेब सभागृह येथे सांगता करण्यात आली.रॅली मध्ये विविध स्वयंसेवी संस्था सहभागी झाल्या यात पुणे एड्स कंट्रोल,जाणीव सामाजिक संस्था,रोटरी क्लब,सहारा आल्हाट,मायेचा आधार,घोरपडी पेठ सामजिक संस्था,लायन्स क्लब,सावित्रीबाई फुले बचत गट,उड्डाण संस्था इत्यादींच्या प्रतिनिधींनी यात सहभाग घेतला.या प्रसंगी मुक्ती उद्धारण सेवा ट्रस्टचे चेअरमन अशोक राज, रेजी कलेवरा थॉमस (जनरल सेक्रेटरी ),भारती डोग्रे (मॅनेजर),रो.राजेद्र भवाळकर(रोटरी क्लब),अलका गुंजाळ(सावित्रीबाई फुले बचत गट)आदी मान्यवरांच्या बरोबरच कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी त्यांनी निरोध वापरा,एड्स टाळा, एक दो एकदो,एड्स को फेक दो.या व अन्य घोषणा दिल्या.  

छायाचित्र ;जागतिक एड्स दिनानिमित्त निघालेली रॅली    

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite