Peoples Media Pune header

Go Back

द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकौंटंटस ऑफ इंडियाच्या नूतन वस्तूचे मा.प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उदघाटन

04 Dec 2018

द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकौंटंटस ऑफ इंडियाच्या पुणे शाखेच्या नवीन शैक्षणिक संकुलाचे उदघाटन रविवार दिनांक ९ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्रीय मानव संसाधन मंत्री मा.प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते होणार आहे.या प्रसंगी द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकौंटंटस ऑफ इंडियाचे अध्यक्ष CMA.अमित आपटे,केंद्रीय समिती सदस्य,देशभरातील संस्थेचे पदाधिकारी,व सदस्य,पुण्याच्या महापौर मुक्ताताई टिळक,शैक्षणिक,व्यावसायिक व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहे.ही इमारत कर्वेनगर कॅनॉल रस्ता,महर्षी कर्वे शिक्षण संस्थे जवळ आहे.ही आठरा हजार चौ फुट क्षेत्रफळ असलेली चारमजली अद्ययावत व वातानुकुलीत इमारत असून येथे सभागृह व ग्रंथालय आहे.या ठिकाणी कॉस्ट अकौंटंन्सीच्या  व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण दिले जाईल असे अमित आपटे,मिना वैद्य यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite