Peoples Media Pune header

Go Back

ऑप्टीमाईझ इंडियन संस्थेच्या वतीने रविवार दिनांक १६ डिसेंबर रोजी उद्योजकांसाठी १ दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

05 Dec 2018

ऑप्टीमाईझ इंडियन संस्थेच्या वतीने रविवार दिनांक १६ डिसेंबर रोजी उद्योजकांसाठी १ दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.अत्यंत माफक दरात उच्च प्रतीचे व्यावसायिक प्रशिक्षण,ही कार्यशाळा बाणेर येथे बंतारा बिल्डींग ऑडीटोरीयम,मर्सिडीझ शोरूम मागे सकाळी ९ ते सायंकाळी ४ यावेळेत संपन्न होईल.या कार्यशाळेत पुढील तज्ञ मार्गदर्श करतील राजेश मोहन राय(मायक्रोसॉफ्ट माजी संचालक)ज्यांना १०० सर्वोच्च जागतिक मानव संसाधन पुरस्कार २०१८ मिळालेला आहे.या कार्यशाळेद्वारे उच्च प्रतीचे व्यावसायिक शिक्षणद्वारे आपल्या कंपनीत मानव संसाधन अनुकुलीत करा व आपला व्यापार-व्यवसाय वाढवा याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ऑप्टीमाईझ इंडियन संस्थेच्या वतीने यापूर्वी विवेक बिंद्रा संतोष नायर आदींचे मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित केले होते.ही कार्यशाळा व्यावसाईक,व्यापारी,स्टार्टअप,नवउद्योजक,छोटे,मध्यम व मोठे उद्योजक,तसेच व्यवसाय सुरु करू इच्छिणारे यांच्यासाठी उपयुक्त आहे असे ऑप्टीमाईझ इंडियन संस्थेचे सीईओ धीरज चित्तोडीया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.अधिक माहितीसाठी संपर्क optimizeindian@gmail.comतसेच www.optimizeindian.com .मो.8448792525

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite