Peoples Media Pune header

Go Back

“अपंगत्वाच्या कायद्यात अनेक प्रकारच्या अपंगत्वाचा समावेश,मात्र पिडीत व पालक यांना याविषयी अज्ञान”. नितीन ढगे उपआयुक्त अपंग कल्याण

05 Dec 2018

अपंगत्व कायद्यात सरकारने सुधारणा केली असून अनेक प्रकारच्या अपंगत्वाचा यात समावेश आहे.मात्र याप्रकारचे अपंगत्व असलेली व्यक्ती,मुले,अथवा त्यांचे पालक यांना याची माहिती नसते.तसेच याना मदतीसाठी असलेल्या योजनांची माहिती नसते.ते कार्य डॉक्टर्सनी करावेअसे प्रतिपादन अपंग कल्याण उपयुक्त नितीन ढगे यांनी केले.अविचल आंबुलकर स्पीच & हेअरिंग क्लिनिकच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.या प्रसंगी डॉ.समीर जोशी (विभाग प्रमुख बीजेमेडिकल कॉलेज व ससून सर्वोपचार रुग्णालय),डॉ.अविचल आंबुलकर (अविचल आंबुलकर स्पीच & हेअरिंग क्लिनिक),संतोष गायकवाड(सेक्रे प्रोफेशनल असो ऑफ एज्युकेशन रिसर्च &रिहॅबिलीटेशन),आदी मान्यवर उपस्थित होते.या क्लिनिकमध्ये प्युअरटोन ऑडीओलॉजी,ईपी डंन्स ऑडीओमेट्री,व अन्य उपचार केले जातील,सर्व प्रकारची अत्याधुनिक श्रवणयंत्रे उपलब्ध आहेत.तसेच साऊंड ट्रिटेड ऑडीओमेट्री उपलब्ध आहे असे.डॉ.अविचल आंबुलकर यांनी नमूद केले.

छायाचित्र :उद्घाटन प्रसंगी  नितीन ढगे,डॉ.समीर जोशी, संतोष गायकवाड व अविचल आंबुलकर

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite