Peoples Media Pune header

Go Back

क्रिएटीव्ह मास हाउसच्या चित्र प्रदर्शनाचा समारोप

05 Dec 2018

क्रिएटीव्ह मास हाउसच्या वतीने पुण्यात प्रथमच आयोजित ३९ चित्रकारांच्या चित्रप्रदर्शनाचा समारोप उत्साहाने करण्यात आला.राजा रविवर्मा आर्ट गॅलेरी येथे हा कार्यक्रम संपन्न झाला हे प्रदर्शन तीन दिवस सर्वांसाठी खुले होते.समारोप प्रसंगी वत्सला पांडे(क्रिएटीव्ह मास हाउस),रो.रवींद्र पाटील,रो.अजय वाघ,रो.वासवी मुळे,रो.अविनाश पाटील,रो.निशा पाटील आदी मान्यवरांच्या बरोबरच चित्रकार व नागरिक उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना वत्सला पांडे यांनी पुणे हे सांकृतिक शहर आहे.अनेक कलांना येथे उदार आश्रय मिळतो,चित्रकारांना एक व्यासपीठ मिळावा या हेतूने या प्रदर्शनाचे आयोजन केले.त्याला पुणेकरांनी उदंड प्रतिसाद दिला असे सांगिले.

छायाचित्र:समारोप प्रसंगी मान्यवर व कलाकार यांचे समूह चित्र 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite