Peoples Media Pune header

Go Back

शंकरराव मोरे विद्यालयात रोटरी कर्वेनगर इंटरॅक्ट क्लब(बाल रोटरी)ची स्थापना

07 Dec 2018

रोटरी क्लब कर्वेनगरच्या वतीने भारती विद्यापीठाच्या पौड रोड येथील शंकरराव मोरे विद्यालयात रोटरी इंटरॅक्ट क्लब(बाल रोटरी क्लब)ची स्थापना करण्यात आली.या प्रसंगी रोटरी प्रांत ३१३१ चे नियोजित(भावी)प्रांतपाल रो.रवि धोत्रे,सहाय्यक प्रांतपाल गौरी शिकारपूर,रोटरी क्लब कर्वेनगरचे अध्यक्ष शिरीष पुराणिक,प्राचार्य के.एच.पाटील,रो.दिनकर पळसकर,रो.अशोक बापट रो.आशा आमोणकर,आदी मान्यवरांच्या बरोबरच विद्यार्थी उपस्थित होते. रोटरी इंटरॅक्ट क्लबच्या अध्यक्षपदी कु प्रवीण एरणकर(९ वि),तर सेक्रेटरीपदी कु.हिमांशू चौधरी याची निवड करण्यात आली.यात ४० विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी आहेत.या प्रसंगी बोलताना रवि धोत्रे यांनी शाळा हे संस्कार केंद्र असते.रोटरी मुळे उत्तम व्यक्तिमत्व विकास होऊन उद्याचे उत्तम नागरिक घडतील असे सांगितले.शिरीष पुराणिक यांनी इंटरॅक्ट क्लबच्या विद्यार्थ्यांनी स्वतःला कमी न समजता आत्मविश्वासाने विविध सामजिक प्रकल्प करावेत असे सांगितले.

छायाचित्र: इंटरॅक्ट क्लबस्थापना करताना रवि धोत्रे,शिरीष पुराणिक,गौरी शिकारपूर,दिनकर पळसकर,के.एच पाटील व  प्रवीण एरणकर हिमांशू चौधरी

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite