Peoples Media Pune header

Go Back

“लैंगिक अत्याचार पिडीत महिलांचा योग्य प्रकारे उपचार व समुपदेशन होणे आवश्यक”- आ.डॉ नीलमताई गो-हे.

08 Dec 2018

लैंगिक अत्याचार पिडीत महिलांच्या उपचार व समुपदेशन विषयी ३७६ कलम नुसार प्रोटोकॉल आहे.त्याचे पालन ब-याच अंशी डॉक्टर्स कडून होते.मात्र काही वेळा पोलीस व मेडिकल स्टाफ यांना माहिती नसल्याने योग्य प्रकारे उपचार,समुपदेशन होत नाही.अत्याचार पिदितेचे योग्य पुनर्वसन सन्मानाने जगणे हा हक्क आहे.असे प्रतिपादन स्री आधार केंद्र अध्यक्ष  आ.डॉ.नीलमताई गो-हे यांनी केले. स्री आधार केंद्र व महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या एकत्रित प्रयत्नांतून ३७६ कलमानुसार बलात्कार पिडीतांसाठी केल्या जाणा-या प्रोटोकॉल वास्तव आणि अपेक्षाया विषयावर संशोधन प्रकल्प राबिण्यात येत आहे.त्याच्या पुढच्या टप्प्या विषयी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.सिल्व्हर रॉक येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी नंदिनी चव्हाण,मुक्ता करंदीकर,जेहलम जोशी,शोभा कोठारी,शेलार गुरुजी,आश्लेषा खंडागळे,नंदिनी जाधव,शिल्पा गवळी,प्रतीक्षा ढमढेरे,अश्विनी शिंदे,आदी व कार्यकर्त्या उपस्थित होते.पिडीतांबाबत शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारांच्या वेळी पाळण्यात येणा-या मेडिकल प्रोटोकॉलची माहिती घेवून या विषयी जनजागृत करणे हा यामागील हेतू आहे.स्री आधार केंद्राच्या वतीने १५ जानेवारीपर्यंत पालघर,रायगड,यवतमाळ,सोलापूर,बीड,या जिल्ह्यांमध्ये हा संशोधन प्रकल्प राबविण्यात येणार आहे.तसेच यातील निष्कर्ष येतील त्याबद्दल आगामी विधीमंडळ अधिवेशनात या बाबत प्रश्न उपस्थित करणार असल्याचे डॉ.नीलमताई गो-हे यांनी नमूद केले 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite