Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लबच्या वतीने संस्थांच्या मदतीसाठी “रेट्रो ते मेट्रो”विथ व्हायोलीन ब्रेथलेस १४ डिसेंबर रोजी सादर

10 Dec 2018

विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीसाठी.शाळांमधील गरीब विद्यार्थी,महिला सक्षमीकरण,व्यवसाय प्रशिक्षण,कॅन्सर रुग्णांसाठी शुध्द जल,अनाथ शाळा व ग्रामीण शाळा यांना ई लर्निंग कीट वाटप, अशा कार्यासाठी रोटरी क्लब ऑफ फॉरच्यूनच्यावतीने शुक्रवार दिनांक १४ डिसेंबर २०१८ रेट्रो ते मेट्रो,विथ व्हायोलीन ब्रेथलेस या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.अक्षय सोमण व राजसी सोमण हे आपल्या १० सहकलाकारांसोबत हा कार्यक्रम सादर करतील.यावेळी निखील राणे(शिळ वादक)यांचा ही सहभाग असेल.विनोदी कलाकार राहुल इंगळे हे कॉमेडी सादर करतील.हा कार्यक्रम गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट येथे संपन्न होईल.याची तिकिटे बालगंधर्व रंगमंच,अण्णाभाऊ साठे हॉल,पुणे सातारा रोड,यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड येथे उपलब्ध आहे असे रोटरी क्लब फोर्च्यूनचे अध्यक्ष रो.डॉ.दीपक तोष्णीवाल सेक्रेटरी भरत गुरव,खजिनदार भालचंद्र कुलकणी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.   

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite