Peoples Media Pune header

Go Back

हेमंत देशपांडे लिखित “व्यावसायिकांसाठी २१ महत्वाचे कायदे”.या पुस्तकाचे प्रकाशन.

30 Dec 2018

सध्याच्या गतिमान युगात व्यवसायिकांना वेळ फार कमी असतो.अनेक कायद्यांशी संबंध येतो मात्र पुरेशा माहिती अभावी त्यांना नुकसान होऊ शकते.हे लक्षात घेवून हेमंत देशपांडे(सल्लागार) यांनी व्यावसायिकांसाठी २१ महत्वाचे कायदे.(Hand book of 21 Major laws for businessmen),या पुस्तकाची निर्मिती केली.त्याचे प्रकाशन मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या सुमंत मुळगावकर हॉल.सेनापती बापट रोड येथे करण्यात आले.हस्ते चन्द्रशेखर चितळे,अॅड.गौरी भावे,अमर देशमुख,नंदकुमार देशपांडे.आद्या प्रकाशनाच्या या पुस्तकात कामगार,कर व अन्य विषयाच्या कायद्यांच्या महत्वाच्या बाबी सोप्या भाषेत देण्यात आल्या आहेत.पाने ६५ व किंमत १५० आहे.प्रकाशन प्रसंगी बोलताना लेखक हेमंत देशपांडे यांनी व्यावसायिकांना संपूर्ण कायद्या एवजी फक्त संबंधित बाबींची माहिती थोडक्यात देणे हा पुस्तकाचा हेतू असल्याचे सांगितले.चन्द्रशेखर चितळे यांनी बोलताना आजच्या स्पर्धात्मक युगात नफ्याचे प्रमाण कमी होत चालले आहे.अशावेळी कायद्याची माहिती अभावाने होणारा दंड,नुकसान टाळणे महत्वाचे आहे असे सांगितले.अॅड गौरी भावे यांनी बोलताना आपल्या समस्ये विषयी कोणत्या तज्ञाचा सल्ला घ्यावा याचे या पुस्तकाने मार्गदर्शन होईल असे सांगितले.

छायाचित्र :डावीकडून हेमंत देशपांडे,चन्द्रशेखर चितळे,गौरी भावे,अमर देशमुख,व नंदकुमार देशपांडे.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite