Peoples Media Pune header

Go Back

“नैराश्य-डिप्रेशन करणे व उपाय”,या विषयावर डॉ.आशिष तवकर यांचे ९ जानेवारीला मोफत व्याख्यान.

04 Jan 2019

नैराश्य-डिप्रेशन ही जागतिक समस्या बनली आहे.समाजातील सर्व स्तरातील व वयोगटातील नागरिक याला बळी पडतात.भारतात मोठ्या संखेने याचा प्रादुर्भाव आहे.हे लक्षात घेवून रोटरी क्लब ऑफ पुणे फोर्च्यूनच्या वतीने प्रख्यात मानसोपचार तज्ञ व सल्लागार डॉ.आशिष तवकर.यांचे नैराश्य-डिप्रेशन करणे व उपाय,या विषयावर सर्वांसाठी मोफत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.हे व्याख्यान बुधवार दिनांक ९ जानेवारी रोजी संध्याकाळी ७.३० वाजता फर्ग्युसन कॉलेज अल्युमिनी हॉल येथे संपन्न होईल.

     भारतात जगातील एकूण नैराश्य ग्रस्त व्यक्ती पैकी २०% लोक आहेत.यात सर्व जातिधर्म,सर्व आर्थिकस्तर व सर्व वयोगटाचा समावेश आहे.एकूण आत्महत्ये मध्ये यांचा मोठ्या संखेने समावेश होते.यासाठी लवकरात लवकर योग्य निदान व उपाय करता येतात.याविषयी म्हणावी तेव्हडी जागरूकता समाजात दिसत नाही.या विषयावर माहिती मिळण्यासाठी जास्तीत ज्यास्त नागरिकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन रो.डॉ.आशिष तवकर व रो.डॉ.दीपक तोष्णीवाल यांनी पत्रकार परिषदेत केले. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite