Peoples Media Pune header

Go Back

जेफोरईच्या वतीने उद्योजक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

11 Jan 2019

उद्योजकांना आपला व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन करणारी संस्था जेफोरईच्या वतीने उद्योजकांना आपला व्यवसाय कसा वाढवावा यांचेकरिता मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.हॉटेल कपिला यथे झालेल्या या कार्यक्रमात विशाल मेठी(संस्थापक जेफोरई),व उज्ज्वलकुमार जैतवार यांनी उद्योजकांना मार्गदर्शन केले.या प्रसंगी बोलताना विशाल मेठी यांनी उद्योजकांनी डिजिटल मार्केटिंगचा वापर अवश्य करावा मात्र फक्त त्यावरच अवलंबून राहू नये.निवडक व आपल्या उद्योगास सहाय्यभूत उद्योजकाच्या प्रत्यक्ष गाठी भेटी घ्याव्यात असे सांगितले. उज्ज्वलकुमार जैतवार यांनी आपला उद्योग सतत वाढवा यासाठी योजनापूर्वक काम करणे आवश्यक आहे.तसेच उत्तम सेवेद्वारे ग्राहकाचा विस्वास संपादन करणे अत्यंत गरजेचे आहे असे सांगितले.कार्यक्रमास विविध क्षेत्रातील उद्योजक व नवउद्योजक उपस्थित होते.

छायाचित्र :मार्गदर्शक व उद्योजक यांचे समूहचित्र 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite