Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब रॉयलच्या वतीने फ्रेनी तारापूर यांना “सर्व्हिस एक्सलंस रेकग्निशन अॅवार्ड”

12 Jan 2019

रोटरी क्लब ऑफ रॉयलच्या वतीने फ्रेनी तारापूर(माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष फॅमिली प्लानिंग असो.ऑफ इंडिया)यांना सर्व्हिस एक्सलंस रेकग्निशन अॅवोर्ड रो.पंकज शहा(रोटरी प्रांत सेवा प्रकल्प संचालक) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.या प्रसंगी रोटरी क्लब रॉयलचे अध्यक्ष गिरीश देशपांडे,सेक्रेटरी अस्मिता वैद्य,अवलोकिता माने(अध्यक्ष फॅमिली प्लानिंग असो.इंडिया पुणे अध्यक्ष),गीतांजली देशपांडे(सेक्रेटरी फॅमिली प्लानिंग असो.इंडिया पुणे),आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी पदाधिकारी सदस्य,युवारोटरी क्लब सदस्य, फॅमिली प्लानिंग असो.इंडिया पुणेचे कर्मचारी उपस्थित होते.शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ, व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.हा कार्यक्रम फॅमिली प्लानिंग असो.इंडिया पुणेच्या चांदणीचौक येथील कार्यालयात संपन्न झाला.या प्रसंगी बोलताना पंकज शहा यांनी समाजाची उत्तम सेवा करणा-या व्यक्तींना त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता म्हणून हा पुरस्कार दिला जातो असे सांगितले.सत्काराला उत्तर देताना फ्रेनी तारापूर यांनी बांगलादेश सारखे छोटे देश कुटुंबनियोजनात उत्तम कामगिरी करीत आहेत.आपल्या देशात याकडे थोडे दुर्लक्ष होत आहे.तसेच रोटरी क्लबने रस्त्यावर थुंकणा-या नागरिकांत जनजागृती करावी अशी अपेक्षा व्यक्त केली व यामुळे टीबी(क्षय)रोगाचा प्रसार होतो असे सांगितले.

छायाचित्र :डावीकडून अस्मिता वैद्य,गिरीश देशपांडे,फ्रेनी तारापूर,पंकज शहा,अवलोकिता माने,गीतांजली देशपांडे,

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite