Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब सिंह्गडरोडच्या वतीने दिव्यांगांसाठी नोकरी महोत्सवाचे आयोजन.

15 Jan 2019

अपंगत्व,अस्थिव्यंग,कर्णबधीर,मुकबधीर यांच्यासाठी रोटरी क्लब सिंहगडरोडच्या वतीने नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.यात सुमारे ३०० दिव्यांगांनी सहभाग घेतला.विमलाबाई गरवारे शाळा डेक्कन येथे झालेल्या या कार्यक्रमात यशस्वी दिव्यांग उद्योजक तरुणी अंकिता आर्वीकर हिचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी रोटरी क्लब सिंह्गडरोडचे अध्यक्ष रो.श्रीकांत पाटणकर,रो.मकरंद टिल्लू,रो.सतीश खाडे,आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना सतीश खाडे यांनी दिव्यांग व्यक्ती देखील उत्कृष्ट सेवा बजावतात,व उत्तम उत्पादनांची निर्मिती सुद्धा करतात.त्यांना उद्योजकांनी आपल्या उद्योगात सामावून घेतले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.  

छायाचित्र :दिव्यांग उद्योजिका कु.अंकिता हिचा सत्कार करताना रो.श्रीकांत पाटणकर,सतीश खाडे,श्री व सौ आर्वीकर. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite