Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब रॉयलच्या वतीने ईडार्च संस्थेतील दिव्यांग मुलांना तिळगुळ वाटप.व कागदी पिशव्यांसाठी रद्दी प्रदान.

15 Jan 2019

मकर संक्रांती निमित्त तिळगुळ वाटले जाते.रोटरी क्लब ऑफ रॉयलच्या वतीने नतावाडी यथील दिव्यांग मुलांची ईडार्च उद्योगसंस्था येथील मुलांना तिळगुळ वाटप करण्यात आला.तसेच ही मुले अन्य औद्योगिक उत्पादनां बरोबरच कागदी पिशव्यांचे ही उत्पादन करतात.यासाठी सर्व रोटरी सदस्यांनी आपल्या घरातीळ रद्दी पेपर्स जमा करून संस्थेस दिले.या प्रसंगी रोटरी क्लब रॉयलचे अध्यक्ष रो.गिरीश देशपांडे,ईडार्च संस्थेचे अध्यक्ष दिलीप देशपांडे,रो.उदय कुलकर्णी,प्रशांत देशपांडे,आरती देशपांडे,मेघा कुलकर्णी,अस्मिता वैद्य,वृषाली देशपांडे,अजय चौधरी,संजय लगाडे,शोभा नहार,रसिका विघे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलतना  ईडार्च संस्थेचे अध्यक्ष दिलीप देशपांडे यांनी दिव्यांग मुलांमध्ये एखादी कमतरता असते मात्र त्यांच्या अन्य क्षमता वाढलेल्या असतात.त्यांना त्यांच्या योग्यतेने काम शिकविल्यास ते उत्तम उत्पादने तयार करतात.उत्पादकांनी आपले उत्पादन या विद्यार्थ्यांकडून करून घेतल्यास त्यांना उत्तम उत्पादने मिळतील व विद्यार्थी स्वावलंबी होतील असे सांगितले.

छायाचित्र :दिव्यांग मुलांना तिळगुळ देताना गिरीश देशपांडे व अन्य रोटरी सदस्य.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite