Peoples Media Pune header

Go Back

गुणवंत विद्यार्थ्यंचा मा.दिलीपभाऊ कांबळे यांच्या हस्ते सत्कार.

04 Feb 2019

परफेक्ट शैक्षणिक मार्गदर्शन संस्थेच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त १० व १२ वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सामाजिकन्याय राज्यमंत्री दिलीपभाऊ कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच १० व १२ वीच्या परीक्षे संबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. महात्मा फुले भवन वानवडी येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी संस्थापक इरफान सय्यद सर,हिना सय्यद मॅडम,सभागृह नेते श्रीनाथ भिमाले,नगरसेवक हाजी गफूर पठाण,नगरसेविका हमीदा अनिस सुंडके,नगरसेविका कालींदाताई पुंडे,माजी नगरसेवक रईस सुंडके,महेश पुंडे,प्रिन्सिपल तबस्सुम शेख,अदनान शेख आदी मान्यवर उपस्थित होते.या वेळी बोलताना दिलीप कांबळे यांनी विद्यार्थ्यांनी परीक्षेतील मार्कच सर्वस्व समजू नये,तर आपल्या व्यक्तिमत्व विकासाकडे ही लक्ष द्यावे,मोबाईल,सोशल मिडिया यात ज्यास्त गुरफटू नये असे सांगितले.

छायाचित्र :गुणवंत विद्यार्थी सत्कार करताना डावीकडून श्रीनाथ भिमाले,अदनान शेख,दिलीपभाऊ कांबळे,इरफान सय्यद,हाजी गफूर पठाण व अन्य मान्यवर  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite