Peoples Media Pune header

Go Back

बीएनआयच्या वतीने विद्यार्थी आत्महत्या विरोधी प्रकल्पाच्या मदतीसाठी “रेन अ थॉन”संपन्न.

10 Feb 2019

अल्पवयीन विद्यार्थी आत्महत्या हा गंभीर सामाजी समस्या बनली आहे.तिला आळा घालण्यासाठी सामजिक प्रकल्पाच्या मदतीसाठी बीएनआय पुणे इस्ट व नॉर्थच्या वतीने रेन अ थॉनचे आयोजन करण्यात आले.राज्य राखीव पोलीस दलाच्या वानवडी येथील मैदानात याचे उद्घाटन डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस सुनील फुलारी यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी बीएनआय इंडिया ऑपरेशन हेड अतुल जोगळेकर,बीएनआय पुणे इस्ट व नॉर्थ रिजनचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर भरत डागा व अन्य पदाधिकारी,५०० बीएनआय सदस्य उद्योजक, व कुटुंबीय,पोलीस दलातील सदस्य व मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमातून निर्माण होणारा सुमारे ४ लाख निधी कनेक्टिंग एनजीओ या संस्थेस प्रदान करण्यात येणार आहे.देणा-याला मिळते हे तत्व संस्था अंगिकारते व समजाच्या गरजेसाठी देणे याकरिता हा उपक्रम केल्याचे भरत दगा व अतुल जोगळेकर यांनी नमूद केले.उद्घाटन प्रसंगी बोलताना सुनील फुलारी यांनी खेळ,व्यायाम यासाठी दिलेला वेळ हा खर्च नसतो तर ती गुंतवणूक असते असे सांगितले.या उपक्रमाच्या संयोजनात व नियोजनात अजिंक्य चॅप्टर सदस्य,नॉर्थ रिजन व पदाधिकारी यांनी विशेष सहकार्य केले.

छायाचित्र :रेन अ थॉन ला सुरुवात करताना भरत डागा,अतुल जोगळेकर,सुनील फुलारी व अन्य 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite