Peoples Media Pune header

Go Back

पोलीस आयुक्त के.व्यंकटेशम यांचे निसर्गचित्र देवून स्वागत.

13 Feb 2019

वाहतूक नियमांबाबत जनजागृती चित्र प्रदर्शनाचे आयोजक,भारतीय कला प्रसारिणी सभेचे सचिव पुष्कराज भालचंद्र पाठक,व वाहतूक शाखेच्या उपयुक्त तेजस्वी सातपुते यांनी पोलीस आयुक्त के.व्यंकटेशम यांचे निसर्गचित्र देवून स्वागत करण्यात आले.यावेळी न्यासाचे सचिव पुष्कराज भालचंद्र पाठक म्हणाले कि जनजागृती करणे हे काम एकट्या पोलीस यंत्रणेचे नाही.त्यासाठी समाजसेवी संस्था,शिक्षण संस्था देखील पोलिसांची मदत करून महत्वाची भूमिका निभाऊ शकतील,त्यातून आमचे कला महाविद्यालय आहे,त्यामुळे चित्राच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्यात पोलिसांची मदत करण्याचा निर्णय घेतला.हा उपक्रम उदघाटन समारंभापुरता मर्यादित न राहता जनजागृती ही एक चळवळ निर्माण व्हायला हवी म्हणजे एक न एक दिवस आपली मोहीम नक्की यशस्वी होईल.पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणाले अपघाताचे प्रमाण घटविण्याकरीता आम्ही सतत कार्यरत असतो आणि अशा प्रकारचे जनजागृतीचे उपक्रम राबविल्यामुळे निश्चितच अपघाताचे प्रमाण घटवण्यात खूप फायदा होईल.त्यांनी मुलांच्या चित्रकृतींचे मनापासून कौतुक केले. 

छायाचित्र :पोलीस आयुक्त के वेंकटेशन,उपयुक्त,व सचिव पाठक  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite