नव्या,जुन्या,व हौशी चित्रकारांना योग्य मंच मिळावा या हेतूने गेली तीन वर्ष कार्यरत असलेल्या चित्रकार इंडिया संस्थेच्या वतीने दर्पण कलादालन गोखलेनगर येथे चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.याचे उदघाटन प्रख्यात चित्रकार मुरली लाहोटी यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी चित्रकार प्रा.ताराचंद निकम,चित्रकार गणेश कळसकर,चित्रकार राम फड,चित्रकार आशिक क्षीरसागर,चित्रकार संकेत बारसकर,चित्रकार स्विकार गरग आदी मान्यवरांच्या बरोबरच अन्य चित्रकार,व नागरिक उपस्थित होते.या प्रदर्शनात २६ चित्रकारांची ५२ चित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत.व हे प्रदर्शन सकाळी १० ते ७ या वेळेत नागरिकांना पाहण्यासाठी मोफत खुले आहे.रविवार दिनांक १७ फेब्रुवारी पर्यंत.या प्रसंगी बोलताना मुरली लाहोटी यांनी येथील चित्रे उत्कृष्ट्र असून यात कला व फॉर्म याचा विचार केला आहे असे सांगितले.
छायाचित्र :चित्रप्रदर्शन पाहताना मुरली लाहोटी,राम फड व अन्य
© 2011. Peoples Media Pune