Peoples Media Pune header

Go Back

“गोमाता ही वैदिक काळापासून राष्ट्रीय संपत्ती”.विद्यावाचस्पती डॉ.शंकर अभ्यंकर.

25 Feb 2019

भारतात हा फक्त उपयुक्त पशु नसून प्राचीन वैदिक काळापासून तिला आदराचे व पूजनीय स्थान आहे.पूर्वी श्रीमंती ही गाईंच्या संखेवरून मोजली जात होती.तिच्या विविध उपयुक्तते विषयी आधुनिक काळातही संशोधन होत आहे.व शेतीसाठी तर अनेक उपयुक्त बाबी जसे गोमय,गोमुत्र आदीची उपयुक्तता आज नैसर्गिक शेती पद्धतीत मोठी आहे.फक्त दूधच नाही तर दुध न देणा-या गाईला भाकड म्हणणे चूक आहे.कारण गोमय,गोबर गॅस खते,व गोमुत्र अशी अनेक उत्पादने मिळतात. असे प्रतिपादन विद्यावाचस्पती डॉ.शंकर अभ्यंकर यांनी केले.कामधेनु सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते मार्गदर्शन करीत होते.बीएमसीसी कॉलेज च्या जे एन टाटा सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी शास्रज्ञ विजय भटकर,कामधेनु सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक रत्नपारखी,उपाध्यक्ष विजय ठुबे,सचिव समीर देवधर,खजिनदार सुभाष टिल्लू,सेवासिद्धी फौंडेशनच्या अध्यक्ष रोशनी जैन,अनिता तलाठी,अविनाश मुगळीकर,निवृत्त सनदी अधिकारी,लीना मेहेंदळे,पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमप,माजी कृषी आयुक्त डॉ.उमाकांत दांगट आदी मान्यवरांच्या बरोबरच कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.आपल्या प्रास्तविकात बोलताना विवेक रत्नपारखी यांनी गोसेवा व शेती,प्रशिक्षण.उद्योग अशा विविध बाबतीत प्रतिष्ठान कार्य करणार असल्याचे सांगितले.विविध वक्त्यांनी मागर्दर्शन करतना आधुनिक काळात भारतीय गोवंशाचे महत्व,उपयुक्तता याविषयी सखोल मार्गदर्शन केले. 

छायाचित्र :दीपप्रज्वलन करताना डावीकडून विजय भटकर,लीना मेहेंदळे,शंकर अभ्यंकर,समीर देवधर,विवेक रत्नपारखी

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite