Peoples Media Pune header

Go Back

भरत मित्र मंडळ महाशिवरात्री महोत्सवाचे मा.गिरीश बापट यांच्या हस्ते उद्घाटन।

02 Mar 2019

भरतमित्र मंडळाच्या महाशिवरात्री महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री ना.गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले.हरीभाऊ साने वाहनतळ,नारायणपेठ येथे झालेल्या या उद्घाटन समारंभ प्रसंगी भरत मित्र मंडळाचे मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दाभेकर,विवेक खटावकर(शिल्पकार),उल्हास कदम(उद्योजक),बाबाराजे जाधव(सामाजिक कार्यकर्ते),मधुकर पाठक(उद्योजक),शितल शिंदे(नगरसेवक),निरंजन दाभेकर,राजेंद्र पंडित,महेश वाघ,आदि मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवर,कलावंत,व नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.या कार्यक्रमात विविध नृत्य संस्थांच्या मुला-मुलींनी आपली कला सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली.तसेच गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.                                 

छायाचित्र :उद्घाटन प्रसंगी डावीकडून विवेक खाटावकर,जयंत वाडकर,उल्हास कदम,गिरीष बापट,बाबाराजे जाधव,मधुकर पाठक,शितल शिंदे,बाळासाहेब दाभेकर.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite