Peoples Media Pune header

Go Back

पॅडल फॉर चेंज सायकल रॅली,हर नारी का सम्मान हो,पुणे ते दिल्लीचे आयोजन.

05 Mar 2019

पुणे ते दिल्ली अशा सायकल रॅलीचे आयोजन रोटरी क्लब लोकमान्य नगर व BSR स्पर्श फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे.याचे उद्दिस्ट म्हणजे हर नारी का सम्मान हो.तसेच अॅसिड हल्ला,महिलांचा छळ इत्यादी विषयी जनजागृती करणे हा आहे.यात जण सहभागी होणार आहेत.याचे नेतृत्व भूपेंद्रसिंग राठोड हे करणार आहेत.ही रॅली शुक्रवार दिनांक ८ मार्च रोजी पुणे येथून ऑटो क्ल्स्टर पिंपरी चिंचवड येथून सुरू होईल.ते शुक्रवार दिनांक २२ मार्च रोजी इंडिया गेट येथील अमर जवान ज्योति येथे त्याची सांगता होईल.यात रोटरी क्लब लोकमान्य नगर रोटरी क्लब हेरिटेज सहभागी होतील.रोटरी क्लब लोकमान्यनगरचे अध्यक्ष रो.वासवी मुळे.रो.अजय वाघ व अन्य सहभागी होणार आहेत.रोटरीचे प्रांतपाल रो.डों.शैलेश पालेकर हे रॅलीचा शुभारंभ करणार पिंपरी चिंचवड मनपा येथे करणार आहेत. रॅलीचा मार्ग पुणे,सूरत,बडोदा,अजमेर,जयपूर,ते दिल्ली असा असणार आहे.व यात सुमारे १५०० किमी सायकल प्रवास १५ दिवसात करण्यात येईल असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite