Peoples Media Pune header

Go Back

विव्हज फिनिशिंग स्कूलच्या विद्यार्थ्यानी लंडन येथील किड्स फॅशन वीकमध्ये यश संपादन केले.

06 Mar 2019

विवेक पवार व श्रीमती आरती राय संचालित विव्हज फिनिशिंग स्कूलच्या विद्यार्थ्यानी नुकतेच लंडन किड्स फॅशन वीक मध्ये यश संपादन केले आहे.यात ६ विद्यार्थ्यानी मिनी मोडच्या लंडन किड्स फॅशन स्पर्धेत एक आठवडा सहभाग घेतला व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रथमच रंपवर चालण्याचा प्रथमच सन्मान मिळविला.या जागतिक व्यासपीठावर जाणे तशी सोपी गोष्ट नव्हती. कारण स्पर्धा अतिचय कठीण होती. स्पर्धेत 150 मुलांनी भाग घेतला.त्यांच्या ऑडिशन क्लिपसह तीन फेर्‍या झाल्या.यापैकी ईश्वरी देशपांडे,तनिष्क गोसावी,ओजश्वा कोंढरे,शौर्य नागदेव,रिया गोखले,आणि विवान पिंगळे हे विद्यार्थी यशस्वी झाले.लंडन किड्स फॅशन आठवडा हा दोन दिवसीय कार्यक्रम १५ व १६ फेब्रुवारी २०१९ रोजी झाला. यावेळी पेफोर्टेन किल्ल्यातील आंतरराष्ट्रीय ब्रॅंड लुलू एट गिगी बरोबर फॅशन शूटसाठी ईश्वरीची निवड करण्यात आली.तनिष्क विवान आणि ईश्वरी यांनी लंडनच्या पार्श्वभूमीवर विशेष बाहयशूट देखील केले.विव्हज फिनिशिंग स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चार वर्षापूर्वी देखील १५० विद्यार्थी साहभागी झाले होते.आरती राय व विवेक पवार यांना बालक्षेत्रात काही करी करण्याची इच्छा होती.भारतीय मुले प्रतिभाशाली आहेत मात्र त्यांना योग्य व्यासपीठ देण्याचा प्रयत्न आमचा आहे.दुबई मध्ये मार्च मध्ये व लंडन आणि मिलान येथे सप्टेंबर व ऑक्टोबर मध्ये स्पर्धा होतात.तसेच किड्स क्रोनिकल या मासिकाची सुरुवात देखील  त्यांनी केली.विवेक पवार हे माजी ग्रासिम मिस्टर इंडिया व लंडन येथे प्रशिक्षित ट्रेनर आहेत.तर आरती सध्या पीएचडी करीत आहेत.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite