Peoples Media Pune header

Go Back

जागतिक महिला दिनानिमित्त रोटरीच्या वतीने विविध क्षेत्रातील ९ कर्तुत्ववान महिलांना पुरस्कार.

09 Mar 2019

रोटरी कलब ऑफ पुणे कर्वेनगर,पाषाण,व सिहगड रोड यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्‍या ९ महिलांना विविध पुरस्कार देवून गौरविण्यात आले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे सेवासदन सभागृह येथे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजक रोटरी कर्वेनगरचे अध्यक्ष शिरीष पुराणिक,रोटरी क्लब पाषाणचे आध्यक्ष हेमंत जेरे,रोटरी क्लब सिहगडचे अध्यक्ष श्रीकांत पाटणकर होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष नियोजित प्रांतपाल रश्मी कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे माजी सनदी आधिकारी लिना मेहेंद्ळे होत्या. या कार्यक्रमात रश्मी कुलकर्णी(महिला गौरव),लिना मेहेंद्ळे(सेवा गुणवत्ता),देविका पळशिकर(क्रीडा गौरव)दीपा कुलकर्णी(शिक्षक गौरव),वासंती जोशी(क्रीडा गौरव),जयश्री बापट (साहित्य गौरव),प्रचिती सुरू (अभिनय गौरव),सुवर्णा माटेगावकर(कला गौरव),रश्मी ऊर्ध्वरेषे(व्यावसायिक गुणवत्ता).असे पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुष्प गुच्छ,श्रीफळ,मानपत्र,व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. याप्रसंगी बोलताना लिना मेहेंद्ळे यांनी आपले कर्तव्य बाजवतांना सदसद विवेक बुद्धी जागृत ठेवावी,व सतत नवे शिकण्याच्या प्रयत्न करावा असे संगितले. रश्मी कुलकर्णी यांनी हल्लीच्या काळात स्रि पुरुष भेदभाव राहिला नाही महिला या सर्वच क्षेत्रांत उत्तम कामगिरी बजावत आहेत.असे संगितले.

छायाचित्र :पुरस्कार प्राप्त महिला व मान्यवर यांचे समूहचित्र 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite