Peoples Media Pune header

Go Back

“राजमाता जिजाऊ यांचे संस्काराचे आचरण महिलांनी आंगीकारले पाहिजे,”-विशेष पोलिस महानिरीक्षक विठ्ठल जाधव

13 Mar 2019

एकाच वेळेला अनेक अवधाने सांभाळत आयुष्य जगणार्‍या महिलांनी विज्ञान,संरक्षण,अवकाश अशा आव्हानात्मक क्षेत्रातही कर्तुत्वचा ठसा महिलांनी उमटविला आहे.महिलांच्या प्रगतीचा उंचविलेला आलेख देशाला विकसित राष्ट्रांच्या पंगतीत नेवून बसवेल,तसेच आधुनिक महिलांनी राजमाता जिजावू यांचे संस्कार आणि सावित्रीबाई फुले यांचे स्रि शिक्षणाचे कार्य नव्या युगातील महिलांपर्यंत पोचविण्याची जबाबदारी आहे”. असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष विशेष पोलिस महानिरीक्षक विठठल जाधव यांनी रामकमल फाउंडेशन आयोजित रणरागिणी पुरस्कार वितरण सोहळ्यात व्यक्त केले.महात्मा फुले वस्तुसंग्रहालय येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी माजी महापौर तात्यासाहेब कदम,माजी नगरसेविका रूपालीताई ठोंबरे पाटील.युवानेते आशीष कांटे,सामाजिक कार्यकर्त्या मीनाक्षी भालेराव,पुष्पा कटारीया,सचिन मिरघे,उल्हास शिंदे,वेणु शिंदे(आयोजक)आदि मान्यवर उपस्थित होते.रणरागिणी पुरस्काराने सन्मानित-अॅड संध्या देशपांडे,मोहिनी कारंडे,विद्या जाधव,प्रतिभा जोशी,आरती सोनग्रा,माया गायकवड,अर्चना चंदनशीवे,वर्षा क्षीरसागर,शालन बराटे,कल्पना दहिभाते,सोनाली भालेसिंग,पुजा झोळे,संगीता भालेराव,सोनाली गाडे,शितल करपे,भाग्यश्री कटके,हिरा सुपेकर.आदींना गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक वेणु शिंदे यांनी केले.सूत्रसंचालन रत्ना दहीवेलकर यांनी केले.तसेच गरजू विद्यार्थिनींना रामकमल फाउंडेशनच्यावतीने शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

छायाचित्र :पुरस्कृत व मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite