Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब फोर्च्युनच्यावतीने २३ दिग्गज नागरिकांना विविध पुरस्काराने सन्मानित.

14 Mar 2019

रोटरी क्लब ऑफ पुणे फोर्च्युनच्या वतीने पुण्यातील विविध क्षेत्रातील २३ दिग्गज मान्यवरांचा विविध पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.यात व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार,सेवा गौरव पुरस्कार,ऋषितुल्य पुरस्कार यांचा समावेश होता.फर्ग्युसन कॉलेज अल्युमिनि हॉल येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब फोर्च्युनचे अध्यक्ष रो.डू.दीपक तोष्णीवाल,सचिव भारत गुरव,खजिनदार भालचंद्र कुलकर्णी,असित शहा आदि मान्यवरांच्या बरोबरच रोटरी सदस्य व नागरिक उपस्थित होते.सत्कारार्थी पुढील प्रमाणे,अनुष्का जाचक,दत्ता सागरे,जिया सरंगपाणी,प्रभावती गायकवड,सचिन चांडक,सतीश पाटील,उपेन पांडे,विणा जोशी,नारायण फड,चंद्रशेखर रोकडे,अंजुम फातिमा,सुषमा केसकर,गणेश राव,कांचन घुगे,संयोगिता पाटील,स्मिता केळकर,वैशाली रुईकर,संजय चोरडिया,शशिकांत कुरबेट्टी,विनीता सहदोत,भरत गुरव,भक्ति सापके,व ऋषितुल्य पुरस्कार डॉ.ए.बी.राव. शाल,श्रीफल,पुष्प गुच्छ व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.या प्रसंगी प्रमुख वक्ते सुभेदार भोपालसिंग ज्यांनी १९६२(चीन),१९६५(पाकिस्तान),१९७१(पाकिस्तान/बांगला)अशा तिन्ही युद्धात सहभाग घेतला त्यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.त्यावेळी बोलताना त्यांनी भारत ही वीरांची भूमी आहे.आज ही या वयात सुद्धा शत्रूशी लढण्याची आपली ईछा आहे असे संगितले.    

छायाचित्र :२३ दिग्गज सत्कार प्रसंगी मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite