Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लबच्या वतीने डॉ.सलील कुलकर्णी यांना कला गौरव पुरस्कार प्रदान.

16 Mar 2019

रोटरी क्लब कर्वेनगर,गांधीभवन,सहवास,विज्डम,हिलसाईड,पौडरोड अशा सहा रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध गायक,संगीतकार डॉ.सलील कुलकर्णी यांना कला गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.शाल,श्रीफल,गौरवपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.गांधीभवन कोथरूड येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी माजी प्रांतपाल रो.अभय गाङगीळ,रोटरी क्लब कर्वेनगर अध्यक्ष शिरीष पुराणिक,रोटरी क्लब हिलसाईड अध्यक्ष रो.देवीदास भालेराव,रोटरी क्लब सहवास अध्यक्ष सुधीर वैदय,रोटरी क्लब विज्डम अध्यक्ष रजनी स्वामी,रोटरी क्लब पौड रोड अध्यक्ष प्रदीप डांगे,रोटरी क्लब गांधीभवन अध्यक्ष अमृता देवगावकर.आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संखेने उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना आपल्या कारकिर्दीत अनेक दिग्गज कलाकारां सोबत काम केले.मात्र डोक्यात हवा येवू दिली नाही.विनम्रपणे त्यांचे मोठेपण स्वीकारले.त्यांचे प्रेम हीच माझी शिदोरी आहे असे संगितले.या कार्यक्रमात वैशाली वर्णेकर यांनी सलील कुलकर्णी यांची खुमासदार प्रकट मुलाखत घेतली.  

छायाचित्र :डावीकडून देवीदास भालेराव,शिरीष पुराणिक,प्रदीप डांगे,सलील कुलकर्णी,अभय गाङगीळ,सुधीर वैदय,रजनी स्वामी,अमृता देवगावकर  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite