Peoples Media Pune header

Go Back

ग्लोबल ई.एच.एस.प्रोफेशनल्स ऑफ इंडियाच्या वतीने दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

16 Mar 2019

ग्लोबल ई.एच.एस प्रोफेशनल्स ऑफ इंडियाच्या वतीने १५ व १६ मार्च रोजी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. भोसरी एमआयडीसी येथील फर्न हॉटेल येथे झालेल्या या कार्यशाळा प्रसंगी प्रमुख पाहुणे हेमंत धेंडे (जॉइन्ट डायरेक्टर इंडस्ट्रीयल सेफ्टी),माजी जॉइन्ट डायरेक्टर इंडस्ट्रीयल सेफ्टी राजन लाखे,डॉ.शरद जोशी (अध्यक्ष ग्लोबल ई.एच.एस प्रोफेशनल्स ऑफ इंडिया),चंद्रशेखर चिंचोलकर(मॅनेजमेंट कन्सल्टन्ट),योगिता वायकोळे आदि मान्यवरांच्या बरोबरच विविध कंपन्या व संस्थांतील सुरक्षा अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना हेमंत धेंडे यांनी यापूर्वी उद्योग सुरक्षा म्हणजे फक्त संरक्षक उपाय योजना असे समजले जात होते,मात्र आता.पर्यावरण,व आरोग्यविषयक सुरक्षेलाही महत्व आले आहे व उद्योग त्यासाठी मोठ्या निधीची तरतूद करीत आहेत असे संगितले.डॉ.शरद जोशी यांनी उद्योग सुरक्षा क्षेत्रात जनजागृतीसाठी आगामी काळात उपक्रम राबविणार असल्याचे संगितले.हेमंत लाखे यांनी बोलताना फक्त सुरक्षा नव्हे तर कामाचे ठिकाणी सुयोग्य वातावरण निर्मिती हवी असे संगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता वायकोळे यांनी केले. 

छायाचित्र :दीपप्रज्वलन करताना हेमंत धेंडे ,राजन लाखे,शरद जोशी व चंद्रशेखर चिंचोलकर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite