Peoples Media Pune header

Go Back

माणुसकी फाउंडेशनच्यावतीने महिलांचा सत्कार व “अडचणी किंवा अडथळ्यांवर मात कशी करावी”या विषयावर व्याख्यान.

21 Mar 2019

माणुसकी फाउंडेशनच्या वतीने नुकताच जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात कार्यकरणा-या  महिलांचा सत्कार करण्यात आला.स्काऊट ग्राऊंड सभागृह खजिना विहीर समोर यथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी माणुसकी फाउंडेशन अध्यक्ष रो.डॉ.राजेंद्र भवाळकर,महिला पोलिस निरीक्षक मनीषा झेंडे,रोटरी क्लब ऑफ पुणे मिड ईस्टच्या अध्यक्ष निलीमा डोंगरे,सोनल गोडबोले,सिनेअभिनेत्री प्रार्थना सदावर्ते.राहुल साळुंखे आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात राहुल साळुंखे यांनी “महिलाना आडचणी किंवा अडथळयांवर मात कशी करावी” या विषयावर व्याख्यान दिले. तसेच कर्तुत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला यात पुढील महिलांचा सत्कार करण्यात आला.सुषमा शास्त्री (वृद्धाश्रम),सुधा ढाकने(दिव्यांग विद्यार्थिनी),मनीषा झांबरे(शिक्षिका),नयन बिडवे,यांचा समावेश होता.या प्रसंगी बोलताना राजेंद्र भवाळकर यांनी महिला आता सर्व क्षेत्रात आहेत मात्र त्यांना योग्य तो सन्मान आदर कित्येकदा मिळत नाही.दुय्यम वागणूक मिळते.हे बदलले पाहिजे असे संगितले. 

छायाचित्र :मान्यवर व सत्कारार्थी यांचे समूहचित्र 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite